
लातूर, 23 डिसेंबर (हिं.स.)। लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १५ येथील काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ काँग्रेसचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या हस्ते सबुरी हनुमान मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला.
यावेळी अभिजीत देशमुख, लातूरच्या माजी महापौर स्मिता खानापुरे,राजकुमार जाधव, महेश नागलगावे, जितेंद्र स्वामी, राजकुमार कत्ते, यांच्यासह प्रभागातील अनेक काँग्रेसचे निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.प्रचाराच्या निमित्ताने प्रभागातील नागरिकांशी प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या, अपेक्षा व सूचनांचा खासदारांनी आढावा घेतला. लातूर शहराचा सर्वांगीण, समतोल व लोकाभिमुख विकास हाच काँग्रेसचा संकल्प असल्याचे नागरिकांना सांगितले.यावेळी खासदार काळगे यांनी आगामी लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला भरघोस पाठिंबा देऊन विकासाच्या या प्रवासात सहभागी व्हावे, असे आवाहन मतदारांना केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis