लातूर काँग्रेसचे यशपाल कांबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
लातूर, 23 डिसेंबर (हिं.स.)। लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला गळती लागली असल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी विविध पक्षांमध्ये प्रवेश करीत आहेत. प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशानंतर काँग्रे
काँग्रेसचे यशपाल कांबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश


लातूर, 23 डिसेंबर (हिं.स.)। लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला गळती लागली असल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी विविध पक्षांमध्ये प्रवेश करीत आहेत. प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशानंतर काँग्रेसचे यशपाल कांबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला आहे.

माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्या प्रवेशानंतर लातूर आता शहरातील काँग्रेसच्या प्रमुख असणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहे.माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते यशपाल कांबळे यांचा प्रवेश झाला.यावेळी प्रदेश सरचिटणी सइब्राहीम सय्यद, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे,माजी नगरसेवक राहुल कांबळे, आदी उपस्थित होते.

---------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande