
- मनपा निवडणूकीसाठी कॉंग्रेसचे घोषवाक्य
कोल्हापूर, 23 डिसेंबर (हिं.स.)।
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेस पक्षाची शहराच्या विकासाची संकल्पना मांडण्याासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी खा.शाहु छत्रपती महाराज यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन “कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं!”
असे घोषवाक्य जाहीर करीत महानगरपालिकेच्या निवडणूकीला जाणार असल्याचे सांगीतले.
कॉंग्रेस जिल्हा कमिटी कार्यालयात काँग्रेसचे इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते यांना संबोधित केल्यानंतर पत्रकार परिषदेत आ. सतेज पाटील म्हणाले; गेली ५ वर्षे महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारकिर्दीत महानगरपालिकेचा सर्व कारभार राज्य शासन चालवत होते तरीही त्यांनी कोणताही विकास केला नाही. कोल्हापूर शहराचे जे प्रलंबित प्रश्न आहे ते तसेच राहिले. यासाठीच आम्ही पुन्हा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक केला सामोरे जात आहोत. कोल्हापूरच्या विकासाचा आराखडा बंद खोलीत न करता तो जनतेतूनच ठरावा या भूमिकेतून “कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं!” हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. शहराच्या विकासाबाबत नागरिकांच्या अपेक्षा, संकल्पना आणि सूचना थेट स्विकारून त्याच आधारावर काँग्रेस पक्षाचा कोल्हापूर महानगरपालिकेसाठीचा जाहीरनामा तयार केला जाणार आहे. या पत्रकार परिषदेला यावेळी ऋतुराज संजय पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजेश लाटकर, आनंद माने, एड. तौफिक मुल्लाणी, दौलत देसाई, राहुल माने, भारतीताई पवार, सरलाताई पाटील, इंद्रजीत बोंद्रे, बाळासाहेब सरनाईक, दुर्वासबापू कदम, संजय मोहीते, प्रतापसिंह जाधव, अमर समर्थ, शिवानंद बनछोडे, मोहन सालपे, भरत रसाळे, बयाजी शेळके, अनुप पाटील आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar