
लातूर, 23 डिसेंबर (हिं.स.)।लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या कायदेशीर सल्लागार समितीची अर्थात लीगल टीम सोबत बैठक घेण्यात आली.
या बैठकीत प्रत्येक इच्छुक उम्वाराने उमेदवारी अर्ज भरायचा असून, हे उमेदवारी अर्ज कायदेशीर सल्लागार समितीकडे तपासणी करून त्यानंतरच भरण्यात यावे, अशी सूचना देण्यात आली. या संदर्भात कायदेशीर सल्लागार समितीने निवडणूक कार्यालयात रोज सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत उपस्थित राहावे आणि सर्व उमेदवारांच्या निवडणुकीच्या अर्जाची तपासणी करून देऊन नंतर ते उमेदवारी अर्ज भरण्यास सांगावे, असे सांगितले केली.
यावेळी माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे, सुधीर धुत्तेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis