
छत्रपती संभाजीनगर, 23 डिसेंबर (हिं.स.)।
छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या निवडणूक साठी भारतीय जनता पक्षाच्या बैठका घेण्यात येत आहेत फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनुराधा चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये भाजपच्या संघटनावर अधिक भर देण्यात आला
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिकलठाणा मंडळातील प्रभाग क्र.२४ येथे आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
या बैठकीत आगामी काळातील संघटनात्मक कामकाज, कार्यकर्त्यांची भूमिका आणि पक्षबांधणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री .अतुल सावे आमदार श्री.नारायणभाऊ कुचे, माजी महापौर श्री.बापू घडामोडे, मंडळ अध्यक्ष श्री.सुनील जगताप, श्री.रामचंद्र नरोटे, श्री.किसन ठुबे, श्री.लक्ष्मण लव्हाळे, कमलताई नरोटे, मीराताई चव्हाण, श्री.मनोहर जगताप तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis