पुणे जिल्ह्यातील बिबट्याला रोखण्यासाठी उपाय योजना
पुणे, 23 डिसेंबर (हिं.स.)पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड या तालुक्यांतमधील बहुतांशी क्षेत्र डोंगराळ असून यामध्ये पाटबंधारे विभागाचे मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्प आहेत. पीक पध्दती सिंचनाच्या उपलब्धततेमुळे बहुतांशी भागा
पुणे जिल्ह्यातील बिबट्याला रोखण्यासाठी उपाय योजना


पुणे, 23 डिसेंबर (हिं.स.)पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड या तालुक्यांतमधील बहुतांशी क्षेत्र डोंगराळ असून यामध्ये पाटबंधारे विभागाचे मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्प आहेत. पीक पध्दती सिंचनाच्या उपलब्धततेमुळे बहुतांशी भागात ऊसशेती करण्यात येते. ऊसशेतीमुळे वन्यप्राणी बिबट्यास मुबलक भक्ष्य व पाण्याची उपलब्धतता होते, तसेच लपण्यासाठी सुरक्षित अधिवास मिळतो. शेती व्यवसायास जोडधंदा म्हणून करण्यात आलेल्या पशुपालन, कुक्कुटपालन आदी माध्यमातून भक्ष्य उपलब्ध होते.

जिल्ह्यात वन विभागाच्यावतीने मानव व बिबट यामधील संघर्ष कमी करण्याकरिता वन्यप्राणी बचाव व पुर्नभेट, नियमित गस्त, पायाभूत सुविधा व नुकसान भरपाई, सुरक्षितता व काळजी, नियमित प्रशिक्षण, व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. बिबट्यांची शास्त्रीय गणना करण्याच्यादृष्टीने क्षेत्रीय माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे. बिबटप्रवण क्षेत्रात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे गस्त व टेहाळणी, एआयचा वापर, रात्रगस्त करण्यात येत आहे. ग्रामस्तरावर बिबट समस्या निराकरण समिती गठीत करण्यात आल्या आहेत. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे शास्त्रीय व क्षेत्रीय ज्ञान वृद्धींगत करण्याकरिता कार्यशाळेचे आयोजन, 'बिबट कृती दल' बेस कॅम्प स्थापन, संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र घोषीत, एकटी घरे आणि गोठ्याकरिता सौर ऊर्जा कुंपन, मेंढपाळांच्या, ऊसतोड कामगारांना सौर दिवे व लंबुंचे (टेन्ट) वाटप, एकूण ४०० पिंजरे कार्यान्वित, त्या पिंजऱ्याच्या मदतीतून आता पर्यंत ७५ बिबटे वन विभागाने पकडले आहेत. आपदा मित्रांना प्राथमिक बचाव दल (पीएआरटी) सदस्यांना प्रशिक्षण, नागरिकांना नेक गार्डचे वाटप, अनायडर्स मशीन कार्यान्वित आदी उपाययोजना करण्यात येत आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande