
बीड, 23 डिसेंबर (हिं.स.)। शनिदेवाचे आद्यपीठ म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवार सकाळी ११ वाजता शनि जन्मोत्सव आणि वार्षिक यात्रा उत्सव सोहळा संपन्न होणार आहे
गोदावरी काठी वसलेल्या या ऐतिहासिक नगरीत शनिदेवाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून भाविकांनी मोठी गर्दी करत आहे. ब्रह्मवंदाच्या वेद घोषामध्ये पुण्य वाचनाला सुरुवात होऊन अखंड तेल अभिषेकाला सुरुवात झाली आहे. या उत्सवामधील महत्त्वाचा दिवस २७ तारखेला आहे.
या दिवशी संध्याकाळी सहा वाजता विद्युत रोषणाई व फटाक्याच्या गजरेत जन्मोत्सव होणार आहे.
राक्षसभुवन हे शनिदेवाच्या साडेतीन पीठांपैकी पहिले पूर्ण पीठ मानले जाते. प्रभू रामचंद्रांनी स्वतः या ठिकाणी शनिदेवाची स्थापना केली होती, अशी आख्यायिका आहे. येथील शनि महाराज अत्यंत जागृत दैवत असल्याने भाविकांची या स्थानावर मोठी श्रद्धा आहे.
सर्व भाविकांनी श्रवण व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शनिदेव संस्थान व गावकऱ्यांतर्फे करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis