
छत्रपती संभाजीनगर, 23 डिसेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेना पक्षाच्या वतीने भव्य शक्तिप्रदर्शन व जनजागृती रॅली पार पडली. या शक्तीतिपदर्शन रॅलीमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह जिल्ह्यातील आणि शहरातील प्रमुख नेते उपस्थित होते.
ही रॅली क्रांती चौक ते सुरू होऊन (छत्रपती संभाजी महाराज चौक) टीव्ही सेंटर चौकापर्यंत काढण्यात आली.
या रॅलीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरवासीयांना आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना पक्षाला भरघोस मत देऊन महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचे आव्हान करण्यात आले. या शक्तिप्रदर्शन रॅलीसाठी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, महिला आघाडी व युवासेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण परिसरात उजनसमर्थनाचे वातावरण पाहायला मिळाले. असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis