
नाशिक, 23 डिसेंबर (हिं.स.)।
- नाशिक मध्ये राजकीय पक्षांमधील पक्षप्रवेश सुरूच असून काँग्रेसला दोन माजी नगरसेवकांनी मंगळवारी सोडचिठ्ठी दिली असून कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहे याबाबतची भूमिका पुढील दोन दिवसात घोषित करणार आहे
गेल्या काही दिवसांत राजकीयदृष्ट्या जर्जर झालेल्या नाशिकमधील कॉंग्रेसला जबर धक्का बसला आहे. दोन माजी नगरसेवक राहुल दिवे आणि आशा तडवी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे, या दोघांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. राहुल दिवे हे माजी महापौर अशोक दिवे यांचे सुपुत्र असून त्यांनी नाशिक महापालिकेत तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून येत कॉंग्रेसचे प्रतिनिधित्व केले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होत असताना आज कॉंग्रेस पक्षाला अनपेक्षित धक्का बसला. महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर योग्य धोरण निश्चिती नसल्याचे कारणाने दिवे आणि तडवी यांनी पक्ष सोडल्याची चर्चा आहे. दिवे यांचे बंधू प्रशांत दिवे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना ( उबाठा ) पक्षाला जय महाराष्ट्र करीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता राहुल दिवे आणि अशा तडवी नेमका कोणता निर्णय घेतात, याकडे जनतेचे लक्ष लागून राहणार आहे
चौकट
पक्षात निर्णयाचे कोणतेही स्वातंत्र्य नाही. यामुळे गोंधळाचे वातावरण आहे. शेवटी काहीतरी ठोस राजकीय भूमिका घेण्याच्या दृष्टीने कॉंग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हा दोघांची कोणाविरोधात तक्रार नाही. मात्र, शांत बसून जनतेशी प्रतारणा करणे शक्य नाही. कोणत्या पक्षात जायचे हे काही तासांतच ठरणार आहे. भाजप आणि शिवसेना या पक्षांचे पर्याय समोर आहेत.
- राहुल दिवे, माजी नगरसेवक , नाशिक महापालिका
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV