
लातूर, 23 डिसेंबर (हिं.स.)।उदगीर सायकलिंग क्लबच्या २९ उत्साही सायकलस्वांरानी मृदा संवर्धनाचा संदेश घेऊन ते उदगीरहून सोमनाथ, व्दारका या प्रमाणे २ राज्यांतून (महाराष्ट्र आणि गुजरात) १५०० किलोमीटर अंतराचा प्रवास सायकलवर पूर्ण करणार आहेत. या सायकल प्रवासाची सुरुवात उदगीर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून होणार आहे.
ते प्रत्येक शहरात रॅलीच्या माध्यमातून उदगीर ते परळी वैजनाथ, गेवराई, घृष्णेश्वर, शिर्र्डी, नाशिक, किल्ला पारडी, सुरत (हजिरा) ते घोगा (बोटिंग), राजुळा, सोमनाथ (सोरठी सोमनाथ मंदिर), पोर-बंदर, व्दारका (श्री. व्दारकाधिश मंदिर) असा १५०० कि.मी. किलोमीटर अंतराचा प्रवास १२ दिवसात पूर्ण करणार आहेत. साईनाथ कोरे, सुनिल ममदापूरे यांच्या नेतृत्वाखाली सायकलस्वार २००२ सालापासून दरवर्षी ते उदगीर ते तिरुपती हे अंतर सायकलवर पूर्ण करणारी, ही उदगीरमधील विविध क्षेत्रात कार्यरत असणारी मंडळी, या त्यांच्या भक्तीपूर्ण सायकलस्वारीला दरवेळी सामाजिक आणि पर्यावरण संदेशाची जोड देऊन, समाजाप्रती असलेले त्यांचे उत्तरदायीत्व अशा आगळ्या वेगळ्या उपक्रमांतून सातत्यपूर्णपणे निभावत आहेत.
उदगीर सायकलींग क्लबचे हे सायकलस्वार दि. ४ जानेवारी २०२६ रोजी ते श्री. व्दारकाधिश नगरी-व्दारका येथे पोहचणार आहेत. प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी सायकल टीम कॉन्शियस प्लॅनेट (माती वाचवा) उपक्रमासाठी काम करीत आहे. जो ईशा फाऊंडेशनचा एक आउटरीच प्रकल्प आहे आणि मृदा संवर्धन आणि पुनरुज्जीवन याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी काम करीत आहे.
२०१७ मध्ये रामेश्वरम-रॅली फॉर रिव्हर्स- नद्यांसाठी रॅली, २०१८ मध्ये महाबलीपुरम-ईशा विद्या, आणि २०१९-२० मध्ये कोइंम्बतूर-कावेरी कॉलींग २०२१ मध्ये कन्याकुमारी, २०२२ जगन्नाथ-पुरी, २०२३ श्री. पदमनाभस्वामी (त्रिवेंद्रम), २०२४ श्री. राम मंदिर-अयोध्या कॉन्शियस प्लॅनेट (माती वाचवा) या ईशा फाउंडेशनच्या सोशल आउटरी प्रकल्पांसाठी त्यांनी सायकलींगद्वारे सहभाग नोंदवून लांबचा पल्ला गाठला असून ईशा फाउंडेशन च्या उपक्रमात सहभागी व्हायचे हे त्यांचे सलग नववे वर्ष आहे.
सायकलींगचा एक वेगळा मापदंड निर्माण करणा-या आणि उदगीरकरांची शान असणा-या या टीम मध्ये साईनाथ कोरे, सुनील ममदापूरे, गोविंद रंगवाळ, बालाजी इंद्राळे, नागनाथ वारद, अतुल वाघमारे, जगदिश पंडित, मुकेश नेरुणे, ज्ञानेश्वर चंडेगावे, महेश आलमकेरे, कपिल वट्टमवार, भास्कर कुंडगीर, मुकिंद चव्हाण, आकाश चव्हाण, नितीन झुलपे, रामेश्वर तोंडारे, अजित पाटील, सतीशकुमार चवळे, मुकेश नेरुणे, मादलापुरे, प्रेमनाथ मोदी,ओमकार बिरादार, रमाकांत वडजे, प्रमोद बुटले, सुर्यकांत आंबेसंगे, सचिन शेंद्रे, सतिष बिरादार, सचिन पेंडलवाल, हरिप्रसाद दंडिमे, रामेश्वर सोनी, अनिरुद्ध जोशी-हुमनाबादकर तसेच सहकारी म्हणून गणेश गुंडरे, कृष्णा मुंडे, विठ्ठल येनकुरेकर, गोपाळ रोकडे, हे सहभागी आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis