बीड - 27 डिसेंबर पासून शाकंभरी पौर्णिमेनिमित्त शिव महापुराण व सप्ताह
बीड, 23 डिसेंबर (हिं.स.)। वडवणी शहरामध्ये शाकंभरी पौष पौर्णिमेनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा - आणि भव्य कीर्तन महोत्सव तसेच अखंड हरिनाम सप्ताह व भव्य शिव महापुराण कथा श्री. नामदेव महाराज लबडे यांच्या मधुर वा
बीड - 27 डिसेंबर पासून शाकंभरी पौर्णिमेनिमित्त शिव महापुराण व सप्ताह


बीड, 23 डिसेंबर (हिं.स.)। वडवणी शहरामध्ये शाकंभरी पौष पौर्णिमेनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा - आणि भव्य कीर्तन महोत्सव तसेच अखंड हरिनाम सप्ताह व भव्य शिव महापुराण कथा श्री. नामदेव महाराज लबडे यांच्या मधुर वाणीतून संपन्न होणार आहे.

शनिवार २७ डिसेंबर रोजी सुरूवात होणार असून शनिवार, ३ जानेवारी २०२६ रोजी समारोप होणार आहे. यादरम्यान विविध धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक उपक्रमांची मोठी भक्तीची पर्वणी राहणार आहे.

. या सप्ताहामध्ये व कीर्तन महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकारांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. या उत्सवासाठी गेल्या महिनाभरापासून जय्यत तयारी करण्यात येत आहे. हा महोत्सव २७ डिसेंबर २०२५ ते ३ जानेवारी २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने दैनदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकडा भजन, ६ ते ७विष्णुसहस्त्रनामपाठ, ७ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १ गाथा भजन, रोज दुपारी २ ते ५ भव्य शिव महापुराण कथा, ५ ते ६ हरिपाठ, रात्री ८ ते १० हरिकीर्तन व नंतर हरिजागर होईल.

२७ रोजी ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, २८ रोजी शकृष्णा महाराज चवरे, २९ रोजी दयानंद महाराज कोरेगावकर, ३० रोजी यशोधन महाराज साखरे, ३१ रोजी राजेश महाराज गुंजर्गेकर, १ रोजी उमेश महाराज किर्दत, २ रोजी उमेश महाराज दशरथे यांचे कीर्तन होणार आहे. तर शनिवार ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ ते १० दरम्यान चौंडेश्वरी मातेची भव्य भव्य प पाळखी मिरवणूक निघेल. सकाळी १० ते १२ या वेळेत नामदेव महाराज लबडे यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर सार्वजनिक महाप्रसादाची पंगत होणार आहे.

या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व धिरज महाराज यादव यांचे आहे. गाथा भजन व काकडा नेतृत्व आणि साथ दामू अण्णा गोंडे व समस्त भजनी मंडळी व हरिपाठ नेतृत्व व साथ सखाराम महाराज बानेगांवकर यांचे आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande