
नाशिक, 23 डिसेंबर, (हिं.स.)। पर्यावरण प्रेमींच्या तपोवन येथे झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना सडेतोड उत्तर देताना म्हणाले की, आम्ही पण निवडणुकीची दिशा बदलू शकतो असे सांगून एक प्रकारे इशारा दिला आहे. आता यावर गिरीश महाजन कसा पलटवार करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिक मध्ये तपोवनातील वृक्षतोडीवरून पर्यावरण प्रेमींचे आंदोलन हे अजूनही सुरूच आहे. या ठिकाणी असलेला प्रकल्प स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी देखील वृक्षतोड करावी लागेल असे देखील प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे. यावरून सुरू असलेल्या संघर्ष अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. तपोवनातील वृक्ष वाचविण्यासाठी आंदोलन करणाऱ्या वृक्षप्रेमींचे पर्यावरणप्रेम बेगडी आहे, असे वक्तव्य कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी 'एनआयटी'च्या वृक्षारोपणाप्रसंगी केले. या वक्तव्याचा पर्यावरणप्रेमींनी निषेध केला आहे. 'खुर्ची आहे म्हणून काहीही बरळायचे का, हे आता बंद करा. हा पर्यावरणाचा, आमच्या श्वासाचा व पुढच्या पिढीचा प्रश्न आहे. महापालिकेची निवडणूक आहे, आमच्या श्रद्धेला नख लावाल तर आमचेही अनेक फॉलोअर्स आहेत, मतदान बदलू शकतात', असा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला.
पर्यावरणप्रेमी डॉ. संदीप भानोसे यांनी व्हिडीओ तयार करून व्हायरल केला आहे. त्यात ते म्हणाले, 'आम्ही तीस वर्षांपासून वृक्षारोपण करीत आहोत, अनेक पर्यावरण संस्थांशी जोडले गेलो आहोत. आतापर्यंत ६५ हजार झाड लावून ती जगविली आहेत. वनविभागाने पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन आमचा सन्मान केला आहे. त्यांना बेगडी कसे म्हणता? हिवाळ्यात झाडे लावलेले आम्ही कधीही पाहिले नाही. जून-जुलैत लावलेली झाडे पावसाच्या पाण्यावर जगतात. १५ हजार झाडे कुठेही लावून टाकली तर ती मरणारच. विकासाच्या नावाखाली पहिला बळी वृक्षांच्या घेतला गेला आहे. यांना कुंभमेळ्याशी काही घेणे-देणे नाही. यांचा बेगडीपणा आहे. प्रत्येक नाशिककरांची तपोवनाशी भावना जोडली गेली आहे. त्याचे राजकारण करू नका.'
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV