
अकोला, 24 डिसेंबर (हिं.स.)।गेल्या सतरा वर्षापासून अकोल्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराचा जागर करीत वैचारिक प्रबोधन करणाऱ्या अ. भा. श्री गुरुदेव सेवा मंडळ अंतर्गत व राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 57 व्या पुण्यतिथी पुण्यस्मरण सोहळ्यात अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रमाची रेलचेल राहणार असून या महोत्सवाची तयारी पर्ण झाली असल्याची माहिती वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीचे अध्यक्ष शिवाजी म्हैसने, कार्याध्यक्ष ॲड. संतोष भोरे, स्वागताध्यक्ष अन्नपूर्णेश पाटील, डॉ गजानन काकड, गंगाधर पाटील, सहदेवराव साँवलकर, रवींद्र ढोरे, दिलीप कराळे, श्रीकृष्ण सावडे, सुरेश राऊत, गजानन जालनकर, चंद्रशेखर चतारे, बहुभाऊ शेळके, डॉ गोवर्धन खवले आदी उपस्थित होते.
महोत्सवाचा प्रारंभ शनिवार दि 27 डिसेंबर रोजी सिव्हिल लाईन परिसरातील जि.प. कर्मचारी भवनात होत असून हा महोत्सव रविवार दि 28 डिसेंबर पर्यंत राहणार आहे. शनिवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता गायत्री परिवाराचे डॉ. अजय उपाध्याय यांच्या सामूहिक ध्यान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने होणार आहे. या नंतर सकाळी वाजता राजराजेश्वर मंदिर येथून ग्रंथराज ग्रामगीता व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमा पालकीची भव्य शोभायात्रा निघणार आहे. ही शोभायात्रा सिटी कोतवाली, गांधी रोड. धिंग्रा चौक, मोठे पोस्ट ऑफिस, सीताबाई कॉलेज मार्गे सिव्हिल लाईन परिसरातील जि. प. कर्मचारी भवनात येऊन येथे या शोभायात्रेचे समापन होणार आहे. दु 12 वाजता महोत्सवाचा उद्घाटन सोहळा होणार असून यात उद्घाटक म्हणून अ. भा. श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरीचे प्रचार प्रमुख प्रकाश महाराज वाघ राहणार आहेत. तर स्वागताध्यक्ष म्हणून अन्नपूर्णेश पाटील, सत्र अध्यक्ष डॉ गजानन नारे राहणार आहेत. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून खा. अनुप धोत्रे, आ. रणधीर सावरकर, आ नितीन देशमुख, आ वसंत खंडेलवाल, आ हरीश पिंपळे, आ साजिद खान पठाण, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, माजी मंत्री रणजित पाटील, माजी आ. बबनराव चौधरी, माजी जि प अध्यक्ष वालमुकुंद भिरड, बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष संग्राम गावंडे, कृष्ण अंधारे, जयंत मसने, प्रकाश मानकर, माधवराव भुईभार, प्रा डॉ संतोष हुशे, चित्रलेखा म्हैसने, डॉ परमेश्वर जुणारे, जगदीश भुतडा, शुकदास गाडेकर, गुरुदेव सेवाश्रम नांदुऱ्याचे आचार्य हरिभाऊ वेरुळकर, सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराज, गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्धन वोथे, गुलावराव महाराज, रवींद्र मुंडगावकर, शिवप्रकाश रुहाटीया, ब्रिजमोहन चितलागे, प्राचार्य डॉ रामेश्वर भिसे, शेख रौफ गुरुजी, विनोदराव पाटील आदीना निमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्यात स्व कालूराम रुहाटिया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने व्यसनमुक्ती सम्राट हभप मधुकर महाराज खोडे यांना व सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष स्व बलदेवरव पाटील यांच्या स्मृतीत जीवन गौरव पुरस्कार प्रहार नेते माजी मंत्री वच्चुभाऊ कडू यांना बहाल करण्यात येणार आहे. यानंतर दुपार पासून विविध तज्ज्ञांचे अभंग वाणी, राष्ट्रसंत संगीतमय जीवनदर्शन, ग्रामगीता प्रवचन आदी कार्यक्रम होऊन रात्री 8 वाजता राष्ट्रीय कीर्तनकार हभप खोडे महाराज यांचा कीर्तन कार्यक्रम होणार आहे. रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळ पासून विविध कार्यक्रम होऊन दुपारी 12 वाजता भव्य युवक युवती संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
सचिन बुरघाटे यांच्या अध्यक्षतेत यात प्रा स्वप्निल इंगोले, डॉ आरती लता देशमुख, डॉ दिपाली सोसे, अक्षय राऊत, डॉ नंदाताई आखरे, वैशाली सावळे, रेहाना शेख, चित्रा काकड, शुभम वरणकार, डॉ राम उपाध्याय, प्रदीप गिरे, पवन गवळी, मुकेश वाकोडे आदी सहभागी होणार आहेत. दुपारी 2 वाजता परमहंस आकडोजी महाराज जीवन दर्शन कार्यक्रम होऊन यानंतर सायंकाळी सर्व संतस्मृती व सर्व सर्वधर्मीय प्रार्थनाचा कार्यक्रम मौन श्रद्धांजलीच्या रूपाने अमोल बांवल व डॉ राजाराम बोथे, डॉ प्रशांत महाराज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. सायंकाळी 7 वाजता भजन संध्येचा कार्यक्रम होणार असून रात्री 8 वाजता संदीपपाल महाराज व रामपाल महाजन यांचा कीर्तन कार्यक्रम होऊन दोन दिवसीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भक्तांनी या दोन दिवशी महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समिती व अ भा गुरुदेव सेवा मंडळचे सेवाधारी उपस्थित होते..
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे