दानवेंची वडिलोपार्जीत जमीन नातेवाईकांच्या नावावर हस्तांतरीत
छत्रपती संभाजीनगर, 25 डिसेंबर (हिं.स.)।लेंभेवाडी, ता. अंबड येथील वडिलोपार्जित गट क्रमांक १, २ व ३ मधील एकूण ३९ एकर जमीन कोणताही मोबदला न घेता, एक रुपयाही स्वीकारू न देता नातेवाईकांच्या नावावर हस्तांतरीत करण्यात आली.या संदर्भात माजी केंद्रीय मंत्री
नात्यांवर विश्वास, परंपरेचा सन्मान आणि सामाजिक बांधिलकी यांचे जिवंत उदाहरण


छत्रपती संभाजीनगर, 25 डिसेंबर (हिं.स.)।लेंभेवाडी, ता. अंबड येथील वडिलोपार्जित गट क्रमांक १, २ व ३ मधील एकूण ३९ एकर जमीन कोणताही मोबदला न घेता, एक रुपयाही स्वीकारू न देता नातेवाईकांच्या नावावर हस्तांतरीत करण्यात आली.या संदर्भात माजी केंद्रीय मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे यांनी पुढाकार घेतला

अधिक माहिती देताना रावसाहेब दानवे म्हणाले की,नात्यांवर विश्वास, परंपरेचा सन्मान आणि सामाजिक बांधिलकी यांचे जिवंत उदाहरण ठरलेल्या या निर्णयाबद्दल गावकऱ्यांच्या वतीने सत्कार समारंभ व स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित राहून गावकऱ्यांनी दिलेला सन्मान नम्रपणे स्वीकारत त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी लेंभेवाडीतील महिलांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून शुभेच्छा दिल्या. महादेव मंदिर येथे नारळ फोडून आशीर्वाद घेतल्यानंतर रथातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शाळेतील चिमुकल्यांकडून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.तसेच परमेश्वर लेंभे यांच्या निवासस्थानी भेट देण्यात आली असता त्यांच्या कुटुंबीयांनी आपुलकीने स्वागत केले.

ग्रामस्थांनी पेढेतुला केली, तर रेणूताई यांची बुंदी लाडूची तुला करण्यात आली. हार घालून, फुलांची उधळण करत आनंदोत्सवाच्या वातावरणात स्वागत करण्यात आले. महिलांनी रेणूताईंना औक्षण करून शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रमात आपुलकी, सन्मान, आनंद आणि सामाजिक ऐक्य यांचे सुंदर दर्शन घडले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande