बाबुलनाथ मंदिराला महसूलमंत्र्यांकडून लीजची प्रत सुपूर्द
•भाविकांच्या सोयी सुविधाबाबत ट्रस्टीशी चर्चा मुंबई, २५ डिसेंबर (हिं.स.) : मुंबईतील श्री बाबुलनाथ मंदिरासाठी महसूल विभागाने श्री बाबुलनाथ मंदिर चॅरिटिजला नाममात्र एक रुपया दरात तीस वर्षांसाठी भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करून दिले. बुधवारी सकाळी यासंदर्भ
बाबुलनाथ मंदिर बावनकुळे


बाबुलनाथ मंदिर बावनकुळे


•भाविकांच्या सोयी सुविधाबाबत ट्रस्टीशी चर्चा

मुंबई, २५ डिसेंबर (हिं.स.) : मुंबईतील श्री बाबुलनाथ मंदिरासाठी महसूल विभागाने श्री बाबुलनाथ मंदिर चॅरिटिजला नाममात्र एक रुपया दरात तीस वर्षांसाठी भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करून दिले. बुधवारी सकाळी यासंदर्भातील शासन निर्णयाची प्रत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंदिराच्या विश्वस्तांना दिली.

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाने हा निर्णय घेतला असे यावेळी महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले. यावेळी मंत्री श्री मंगलप्रभात लोढा, आमदार व भाजपाचे प्रदेश कोषाध्यक्ष श्री मिहिर कोटेचा यांच्यासह विश्वस्त श्री नितीनभाई ठक्कर, प्रदीपभाई श्रॉफ, जितुभाई ठक्कर उपस्थित होते.

हिवाळी अधिवेशनादरम्यान ३० वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय घेतला आहे. बाबुलनाथ मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भक्तांना विविध नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी या जागेची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. आमदार मिहीर कोटेचा यांनी या प्रस्तावाचा सातत्याने पाठपुरावा केला, तर स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा यांनीही याबाबत शिफारस केली होती. अखेर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार ही जागा आता अधिकृतपणे ट्रस्टच्या ताब्यात देण्यात आली असून, त्याचा उपयोग केवळ भाविकांच्या सेवेसाठीच केला जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande