
छत्रपती संभाजीनगर, 25 डिसेंबर (हिं.स.)।भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या जयंतीच्या निमित्ताने‘सुशासन दिना’निमित्त भारतीय जनता पक्षाचे आमदार अनुराधा चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात दीपोत्सव साजरा करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी चिकलठाणा - मुकुंदवाडी मंडळातील माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.अटलजींच्या विचारांनी प्रेरित होऊन सुशासन, लोकसेवा आणि राष्ट्रहिताच्या मूल्यांना पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis