
अमरावती, 24 डिसेंबर (हिं.स.)महानगरपालिकेच्या ८७ जागेसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यापूर्वीची निवडणूक प्रक्रिया २३ डिसेंबरपासून नामांकन अर्ज उचल व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या निवडणुकीत ६ लाख ७७ हजार १८० मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. एकूण ७९७ मतदान केंद्र गठीत करण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीकरीता ७ निवडणूक निर्णय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे ७ ठिकाणी वेगवेगळे कार्यालये आहेत.आज दुसऱ्या दिवशी एकूण ७९४ अर्जाची उचल करण्यात आली तर दोघांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यात प्रभाग क्रमांक १६ ड मधून अब्दुल रफिक हे आहे.
पहिले कार्यालय उत्तर झोन क्र.१ रामपुरी कँम्प अंतर्गत प्रभाग क्र.१, २, ५, दुसरे कार्यालय नवीन तहसील येथे राहणार असून प्रभाग क्र.३, ४, ७, तिसरे कार्यालय मध्य झोन क्र.२ राजापेठ येथे प्रभाग क्र.११, १२, १८, चौथे कार्यालय पूर्व झोन क्र.३ दस्तुरनगर येथे प्रभाग क्र.८, ९, १०, पाचवे कार्यालय महानगरपालिका शिक्षण विभाग अंबापेठ येथे राहणार असून प्रभाग क्र. ६, १३, १७, सहावे कार्यालय पश्चिम झोन क्र.५ जुने तहसील येथे राहील, प्रभाग क्र. १४, १५, १६, सातवे कार्यालय दक्षिण झोन क्र. ४ बडनेरा येथे राहणार असून त्या अंतर्गत प्रभाग क्र.१९, २०, २१, २२ आहे. जे प्रभाग ज्या निवडणूक निर्णय अधिकार्याच्या कार्यालया अंतर्गत येतात तेथेच त्या प्रभागातल्या उमेदवारांना आजपासून अर्ज सादर करावा लागणार आहे. ३० डिसेंबरपर्यंत अर्ज स्विकारले जाणार आहेत.
२५ व २८ डिसेंबरला सुटी राहील. ३१ डिसेंबरला अर्जाची छाननी होईल. १ व २ जानेवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. ३ जानेवारीला उमेदवारांची अंतिम यादी व चिन्हाचे वाटप होऊन प्रचार सुरू होणार आहे. १३ जानेवारीच्या रात्री १० पर्यंत प्रचार करता येईल. उमेदवारला ९ लाख खर्च करण्याची मर्यादा आहे. १५ जानेवारीला मतदान व १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी मनपाची यंत्रणा सज्ज झाली आहे. आदर्श आचारसंहीतेचे पालन काटेकोर व्हावे, यासाठी व अन्य कामासाठी विविध समिती गठीत करण्यात आल्या आहे.
अशी झाली उमेदवारी अर्जाची उचल
झोन क्रमांक १ - ९८ अर्ज
झोन क्रमांक २- ९६ अर्ज
झोन क्रंमांक ३- १६१अर्ज
झोन क्रमांक ४- १३० अर्ज
झोन क्रमांक ५- १०२ अर्ज
झोन क्रमांक ६ - ४९ अर्ज
झोन क्रमांक ७- १५८ अर्ज
एकूण अर्ज ७९४
----------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी