अमरावती - मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी (शप) आणि डाव्यांची आघाडी
अमरावती, 24 डिसेंबर (हिं.स.)अमरावती महानगरपालिका निवडणूक एकत्रितपणे लढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI), अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक आणि रिपब्लिकन पक्ष (खोरीपा/खोब्रागडे गट) यांनी घे
अमरावती मनपा निवडणूक एकत्रित लढणार; डाव्या व राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीची घोषणा


अमरावती, 24 डिसेंबर (हिं.स.)अमरावती महानगरपालिका निवडणूक एकत्रितपणे लढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI), अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक आणि रिपब्लिकन पक्ष (खोरीपा/खोब्रागडे गट) यांनी घेतला आहे. भारतीय संविधानाच्या मूल्यांना बांधील राहून आणि शहराच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून ही आघाडी निवडणूक रणांगणात उतरणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.या आघाडीतील नेत्यांनी स्पष्ट केले की, अमरावती महानगरपालिकेचा विकास हा केवळ घोषणांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून साध्य करण्याचा आमचा संकल्प आहे. शहरातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक, झोपडपट्टी पुनर्वसन, रोजगारनिर्मिती आणि पारदर्शक प्रशासन या मुद्द्यांवर आधारित सविस्तर विकास आराखडा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कॉ. सुनिल घटाळे, कॉ. निळकंठ ढोके, कॉ. जयेंद्र भोगे, कॉ. उमेश बनसोड यांनी संयुक्त आघाडीला पाठिंबा दर्शवला. अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकतर्फे बाळासाहेब कोराटे, प्रा. क्रांती महाजन, व्युतिछ विखेद ठोसर, नंदकिशोर काळमेघ, सचिन मुंदाणे, निरंजन कठाने आणि स्वप्नील नवले सहभागी आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाकडून प्रा. हेमंत देशमुख, मंगेश भटकर, निखिल देशमुख, सैय्यद मंसूर आणि विशाल बोरखडे यांनी भूमिका मांडली. तर रिपब्लिकन पक्ष (खोरीपा) कडून पंजाबराव रामटेके, सुरेश दहिकर, अॅड. दिलीप घरडे आणि डॉ. धनराज कावरे यांनी आघाडीच्या निर्णयाचे समर्थन केले.नेत्यांनी सांगितले की, लोकशाही, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्ये जपणारा सक्षम पर्याय अमरावतीच्या मतदारांना देणे हा या एकत्रित लढ्याचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत ही आघाडी निर्णायक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande