अमरावतीत तिकीट मिळण्यापूर्वीच अनेकांनी सुरू केला प्रचार  
अमरावती, 24 डिसेंबर (हिं.स.)तब्बल साडेतीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीने इच्छुकांच्या राजकीय धावपळीला वेग आला आहे. पक्षाकडून उमेदवारी निश्चित होण्याआधीच अनेक इच्छुकांनी वेट प्रचाराला सुरुवात केली असून, घरोघरी संपर्क, बैठ
अमरावतीत तिकीट मिळण्यापूर्वीच अनेकांनी सुरू केला प्रचार  


अमरावती, 24 डिसेंबर (हिं.स.)तब्बल साडेतीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीने इच्छुकांच्या राजकीय धावपळीला वेग आला आहे. पक्षाकडून उमेदवारी निश्चित होण्याआधीच अनेक इच्छुकांनी वेट प्रचाराला सुरुवात केली असून, घरोघरी संपर्क, बैठकांचा सपाटा आणि प्रचाराचा शुभारंभ सुरू झाला आहे२०१७ मध्ये झालेल्या मागील महापालिका निवडणुकीनंतर विविध कारणांमुळे निवडणूक लांचणीवर पडत गेली या कालावधीत इच्छुकांची संख्या लक्षणीय वाढली. अनेकांनी गेल्या वर्षभरापासूनच आपली उमेदवारी गृहीत धरत प्रभागात 'मशागत' सुरू केली होती. मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. विशेषतः प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर संपर्क वाढविण्यात आला. मात्र, आरक्षणाच्या फेररचनेमुळे काहींच्या तयारीवर पाणी फेरले गेले, तर काही ठिकाणी महिला आरक्षणामुळे 'सौभाग्यवर्ती'ना संधी देण्याची तयारी सुरू केली.

युती, आघाडी की स्वबळ ? राजकीय पक्ष संभ्रमात !

महायुती वा महाविकास आघाडी करायची की स्वतंत्र लढायचे,यावर अद्याप एकमत झालेले नाही. मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरू झाले. त्यामुळे जागावाटप, मित्रपक्षांसाठी किती जागा सोडायच्या आणि स्वतःकडे किती ठेवायच्या, हे गणित गुलदस्त्यातच आहेया अनिश्चिततेमुळे तिकीट वाटप लांबले आहे. तिकिटे लवकर जाहीर केल्यास बंडखोरी उफाळते, हा अद्याप उमेदवार जाहीर केले नाहीत. पण अनुभव लक्षात घेता अनेक पक्षांनी काही घटकपक्षांतील माजी नगरसेवकांनी शहरात प्रचार सुरू केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande