सोलापूर - सात वेगवेगळ्या ठिकाणी मतमोजणी
सोलापूर, 24 डिसेंबर (हिं.स.)। सोलापूरच्या प्रत्येक निवडणुकीचे मतमोजणी केंद्र म्हणून विख्यात असलेले रामवाडी गोडावून सध्या विविध कारणांनी सील करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी इतिहासात प्रथमच रामवाडी गोडावूनशिवाय सात
smc


सोलापूर, 24 डिसेंबर (हिं.स.)। सोलापूरच्या प्रत्येक निवडणुकीचे मतमोजणी केंद्र म्हणून विख्यात असलेले रामवाडी गोडावून सध्या विविध कारणांनी सील करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी इतिहासात प्रथमच रामवाडी गोडावूनशिवाय सात वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे.

महापालिका असो अथवा लोकसभा, विधानसभेची मतमोजणी रामवाडी गोडाऊन मध्ये घेतली जात असे, मात्र यंदा विधानसभा निवडणुकीसंदर्भातील काही उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याने रामवाडी येथील गोडाऊनमध्ये त्या निवडणुकीची मतदान यंत्रे न्यायालयाच्या आदेशान्वये ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे रामवाडी गोडावून सील आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशाशिवाय सदर मतदान यंत्रे हलविता किंवा उघडता येणार नसल्याने, सोलापूर महानगरपालिका निवडणूकीची मतमोजणी कमी वर्दळीच्या सात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्याचा पर्याय प्रशासनाने निवडला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande