ग्रामीण कलावंतांच्या सन्मानासाठी माळेगाव यात्रेत कला मंच - आ. आनंदराव बोंढारकर
नांदेड, 24 डिसेंबर (हिं.स.)। ग्रामीण भागातील लोककलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी माळेगाव यात्रेत स्वतंत्र कला मंच उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यांच्या कलेचे कौतुक व्हावे हाच या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे, असे प्रतिपादन आमदार आनंदराव बोंढारकर
ग्रामीण कलावंतांच्या सन्मानासाठी माळेगाव यात्रेत कला मंच - आ. आनंदराव बोंढारकर


नांदेड, 24 डिसेंबर (हिं.स.)। ग्रामीण भागातील लोककलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी माळेगाव यात्रेत स्वतंत्र कला मंच उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यांच्या कलेचे कौतुक व्हावे हाच या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे, असे प्रतिपादन आमदार आनंदराव बोंढारकर यांनी केले.

यावर्षी माळेगाव यात्रेचे सुयोग्य नियोजन करण्यात आले असून, भाविकांना आवश्यक त्या सर्व सुविधा प्रशासनाच्या समन्वयातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

माळेगाव यात्रेत जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पारंपरिक लोककला महोत्सवाचे उद्घाटन आमदार आनंदराव बोंढारकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमप्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा यात्रा सचिव डी. बी. गिरी, गट विकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप यांच्यासह विविध मान्यवर मंचावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा काठी व घोंगडी देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट विकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी यांनी केले. सरपंच प्रतिनिधी हणमंत धुळगंडे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नरेंद्र गायकवाड, रोहित पाटील, अशोक मोरे, भाऊराव मोरे,उद्धव शिंदे आदींची उपस्थिती होती.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande