
छत्रपती संभाजीनगर, 24 डिसेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गजन गौडा पाटील व श्री.आशिष सुरडकर त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत अधिकृत पक्षप्रवेश केला असल्याचे मंत्री अतुल सावे यांनी सांगितले आहे.
पक्षाची कार्यपद्धती, विचार प्रणाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवत सर्वजण भाजपा परिवारात सहभागी झाले आहेत. त्यांचे मनःपूर्वक स्वागत आहे
यावेळी त्यांच्या सोबत शहर उपाध्यक्ष श्री.प्रशांत आटोळे, शहर सचिव श्री.सागर राजपूत, शहर उपाध्यक्ष श्री.रामकृष्ण मोरे, शहर उपाध्यक्ष श्री.अमित जयस्वाल, जिल्हा उपाध्यक्ष श्रुतीताई काटे, शहर जिल्हा चिटणीस श्री.विशाल वैद्य, शहर उपाध्यक्ष श्री.अमित दायमा, शहर उपाध्यक्ष श्री.मंदार देसाई, विभाग अध्यक्ष श्री.निखिल मालू, विभाग अध्यक्ष श्री.दत्ता भुतेकर, शाखा अध्यक्ष श्री.रितेश देवरे, उपविभाग अध्यक्ष श्री.प्रल्हाद लहिरे, गटाध्यक्ष श्री.सचिन दाभाडे यांनी पक्ष प्रवेश केला..
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis