पनवेल : रिसॉर्ट मालकांसाठी पोलिसांकडून नवीन वर्ष मार्गदर्शक सूचना
रायगड, 24 डिसेंबर, (हिं.स.)।31 डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या आगमनानिमित्त पनवेल तालुका पोलीसांनी हद्दीतील फार्म हाऊस रिसॉर्ट चालक व मालकांसाठी महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी बैठक आयोजित केली. या बैठकीचे मार्गदर्शन तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस नि
पनवेल: रिसॉर्ट मालकांसाठी नवीन वर्ष मार्गदर्शक सूचना


रायगड, 24 डिसेंबर, (हिं.स.)।31 डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या आगमनानिमित्त पनवेल तालुका पोलीसांनी हद्दीतील फार्म हाऊस रिसॉर्ट चालक व मालकांसाठी महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी बैठक आयोजित केली. या बैठकीचे मार्गदर्शन तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वपोनि) गजानन घाडगे यांनी केले.

बैठकीत 30 फार्म हाऊस रिसॉर्ट चालक-मालक उपस्थित होते. पोलीसांनी यावेळी सांगितले की, रिसॉर्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अद्यावत ठेवणे, अमली पदार्थांचा वापर रोखणे आणि स्पीकरसाठी आवश्यक परवानगी घेणे अत्यंत आवश्यक आहे. स्पीकर निश्चित वेळेत बंद करणे, फार्म हाऊसची क्षमता ओलांडून बुकिंग न करणे आणि अग्निशमन किट/फायर वॉटर योग्य ठिकाणी ठेवणे यावर देखील भर देण्यात आला.

तसेच, रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे व्हेरिफिकेशन करणे, सेक्युरिटी गार्ड नेमणे, स्विमिंग पूल असल्यास प्रशिक्षित व्यक्तींची नेमणूक करणे, आणि पार्किंगची योग्य व्यवस्था करून वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

तालुका पोलीस प्रशासनाचे उद्दिष्ट यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसह कार्यक्रम सुरळीत पार पडावा, असा होता. पोलीसांनी स्पष्ट केले की, नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित मालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

उपस्थित मालकांनी पोलीसांच्या सूचना गांभीर्याने घेतल्या असून, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सुरक्षित आणि नियोजित कार्यक्रम राबविण्याचे आश्वासन दिले. पनवेल तालुका पोलीसांच्या यामुळे कार्यक्रमांचे नियोजन अधिक सुरक्षित आणि प्रशासकीयदृष्ट्या नियंत्रित झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande