
नांदेड, 24 डिसेंबर, (हिं.स.) माळेगाव यात्रेत दरवर्षी पारंपरिक लोककला महोत्सवाचे आयोजन केले जाते. या मंचावरून अनेक लोककलावंत घडले असून त्यांना ओळख आणि सन्मान मिळाला आहे. पारंपरिक लोककला जपण्याचे व पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य या महोत्सवातून होत आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर यांनी केले.
कलाक्षेत्रात दीर्घकाळ दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल जिल्हा परिषदेच्या वतीने
श्रीमती आशाताई नरसिंग सुपलकर व शाहीर रमेश गिरी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मानपत्र, शाल व पुष्पहार देऊन हा गौरव करण्यात आला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे थीम साॅंग यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान थीम सॉंगव्दारे जागृती करण्यात आली. तसेच अभियानातील बक्षीस स्वरूपाबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis