जळगाव - राष्ट्रवादीकडून निवडणूक प्रभारी पद संतोष चौधरींकडे
जळगाव, 24 डिसेंबर (हिं.स.) राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकांसाठी शरद पवारांनी मोठा डाव टाकला असून राष्ट्रवादीकडून निवडणूक प्रभारींची यादी जाहीर करण्यात आ
जळगाव - राष्ट्रवादीकडून निवडणूक प्रभारी पद संतोष चौधरींकडे


जळगाव, 24 डिसेंबर (हिं.स.) राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकांसाठी शरद पवारांनी मोठा डाव टाकला असून राष्ट्रवादीकडून निवडणूक प्रभारींची यादी जाहीर करण्यात आली. यात भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्यावरही महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांना प्रभारींच्या यादीत स्थान देण्यात आले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिका निवडणुकींच्या तोंडावर नेत्यांवर मोठी जबाबदारी दिली आहे. २९ महानगरपालिकेत निवडणूक प्रभारींची नेमणूक केली आहे. मुंबईची जबाबदारी रोहित पवार तर पुण्याची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्यावर सोपवली आहे दरम्यान, भुसावळ नगरपालिकेवर राष्ट्रवादीने झेंडा फडकविला आहे. राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गायत्री भंगाळे यांनी मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव केला आहे. यामुळे भुसावळात राष्ट्रवादीचा विश्वास वाढला आहे. अशातच राष्ट्रवादीकडून निवडणूक प्रभारींची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात संतोष चौधरी यांच्यावरही महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे एकनाथ खडसे यांना या यादीत स्थान देण्यात आले नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande