रत्नागिरी : बँक ऑफ इंडियातर्फे देवरूखला २९ डिसेंबरला निष्क्रिय ठेव रक्कम विशेष मोहीम
रत्नागिरी, 24 डिसेंबर, (हिं. स.) : वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत निष्क्रिय ठेव रक्कम (अनक्लेम डिपॉजिट) विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ इंडिय
रत्नागिरी : बँक ऑफ इंडियातर्फे देवरूखला २९ डिसेंबरला निष्क्रिय ठेव रक्कम विशेष मोहीम


रत्नागिरी, 24 डिसेंबर, (हिं. स.) : वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत निष्क्रिय ठेव रक्कम (अनक्लेम डिपॉजिट) विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ इंडियातर्फे येत्या 29 डिसेंबर रोजी देवरूख येथे विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

सोमवारी सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 वाजता पंचायत समिती सभागृहात (बँक ऑफ इंडिया देवरूख शाखेच्या समोर) निष्क्रिय ठेव रक्कम शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मुंबई क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन दत्ताराम कानसे यांनी केले आहे.

निष्क्रिय ठेव रक्कम म्हणजे अशा ठेवी ज्या खातेदाराने दीर्घकाळ म्हणजे 10 वर्षांहून अधिक वापरलेल्या नसतात अशा रकमा संबंधित बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे डिपॉजिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड या निधीत वर्ग करतात. या निधीतील रक्कम खातेदार अथवा त्यांचे वारसदार योग्य कागदपत्रांच्या आधारे परत मिळवू शकतात. या मोहिमेत सर्व बँका सहभागी होणार असून नागरिकांना त्यांच्या खात्यातील निधी परत मिळविण्यास मदत करण्यासाठी ही मोहीम आयोजित करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande