ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज : आयुक्त
ठाणे, 24 डिसेंबर (हिं.स.) : ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025-26 दि. 15 जानेवारी 2026 रोजी होत असून निवडणुकीसाठी ठाणे महापालिकेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून शांततापूर्ण वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असल्याची माहि
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज : आयुक्त


ठाणे, 24 डिसेंबर (हिं.स.) : ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025-26 दि. 15 जानेवारी 2026 रोजी होत असून निवडणुकीसाठी ठाणे महापालिकेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून शांततापूर्ण वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सौरभ राव यांनी दिली. निवडणूकीचा कार्यक्रम हा लोकशाहीचा उत्सव असून या उत्सवात सर्वांनी सहभागी होवून जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी, जी.जी. गोदेपुरे, मिताली संचेती, दीपक झिंजाड आदी उपस्थित होते.

निवडणूक कार्यक्रम

निवडणुकीसाठी सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून 23 ते 29 डिसेंबर, 2025 (सकाळी 11 ते दुपारी 3) दि.30 डिसेंबर, 2025 (सकाळी 11 ते दुपारी 2) या कालावधीत नामनिर्देशन अर्जाचे वाटप व दाखल करता येणार आहे.‍ 31 डिसेंबर 2025 रोजी छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक 2 जानेवारी 2026 असून 3 जानेवारी 2026 रोजी निवडणूक चिन्ह नेमूनदिले जाणार आहे. अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 03 जानेवारी रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल व त्यानंतर 19 जानेवारी 2026 रोजी निवडून आलेल्या उमेदवारांची यादी राजपत्रात प्रसिध्द केली जाणार असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण प्रभाग 33 असून सन 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 18,41,488 इतकी आहे. सर्वात जास्त लोकसंख्या असलेला प्रभाग क्र. 25 असून लोकसंख्या - 62,697 इतकी तर सर्वात कमी लोकसंख्या असलेला प्रभाग क्र. 29 असून लोकसंख्या - 38,172 इतकी आहे. एकूण मतदारांची संख्या 16,49,867 इतकी असून पुरूष मतदारांची संख्या 8,63,878 महिला मतदारांची संख्या - 7,85, 830 व इतर मतदारांची संख्या - 159 आहे.

निवडणूक प्रक्रियेसाठी अधिकारी कर्मचारी नियुक्त

ठाणे महापालिकेच्या 9 प्रभागसमितीनिहाय 11 निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी 1, 2,3 यांची नेमणूक करण्यात आली आहे. 33 प्रभागात एकूण 2013 मतदान केंद्रे असून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी 1,2,3 व शिपाई यांच्या नेमणुका करण्यात येत असून 20 टक्के राखीव असे मिळून एकूण 12,650 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही सुरू आहे. मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रथम प्रशिक्षण दि. 27/12/2025 दि. 28/12/2025 व दि. 29/12/2025 या दिवशी राम गणेश गडकरी रंगायतन व डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे होणार आहे. दुसरे प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी यांचे स्तरावर घेतले जाणार आहे.

निवडणूक कामकाजासाठी यंत्रणा कार्यान्वित

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजाच्या अनुषंगाने 120 वाहने उपलब्ध केली आहेत. सी.सी.टिव्ही व वेबकास्टिंग सुविधा, विद्युत व्यवस्था, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (7500 BU + CU), इंटरनेट व संगणक प्रणाली उपलब्धतता, चहापान भोजनव्यवस्था, मतदान जागृती व प्रसिध्दी व्यवस्था, मतपत्रिका व स्टेशनरी छपाई साठी आवश्यक तो कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande