
Maharashtra, 24 डिसेंबर (हिं.स.)। उल्हासनगर नगरचे 'उबाठा' चे माजी उपमहापौर व माजी सभागृह नेते धनंजय बोडारे, माजी नगरसेविका वसुधा बोडारे, शीतल बोडारे, ओमी कलानी गटाचे माजी नगरसेवक नाना बिराडे यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे स्वागत केले. आ. कुमार आयलानी, प्रदीप राजानी, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वडारिया, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले की, धनंजय बोडारे हे झुंजार नेतृत्व असून त्यांच्याबरोबर अनेक वर्षे काम केले आहे. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही.
श्री. धनंजय बोडारे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या रूपाने आम्ही भगव्या परिवारातच प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात विकासाची गंगा आणली आहे. उल्हासनगर च्या विकासाबाबत आजवर अनेक घोषणा झाल्या. या घोषणा पूर्णत्वाला नेण्यासाठी आणि उल्हासनगरच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
श्री. धनंजय बोडारे यांनी कल्याण पूर्व मतदारसंघातून विधानसभा निवडणूकही लढविली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर