अकोला महानगरपालिका जागावाटपावर भाजप–राष्ट्रवादीची (अ. प.) पहिली बैठक
अकोला, 27 डिसेंबर, (हिं.स.)। अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील जागावाटपाबाबत पहिली बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अ. प.) चे नेते तथा राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी माहिती
Photo


अकोला, 27 डिसेंबर, (हिं.स.)। अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील जागावाटपाबाबत पहिली बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अ. प.) चे नेते तथा राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी माहिती दिली. इंद्रनील नाईक म्हणाले की, युती आणि जागावाटपाचा फार्म्युला सुमारे ९९ टक्के निश्चित झाला आहे. मात्र १ ते २ जागांवर अद्याप तिढा कायम असून तो लवकरच होणाऱ्या दुसऱ्या बैठकीत सोडवण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तसेच काही प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढतीचीही तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जर अंतिम बैठकीत जागावाटपाचा प्रश्न सुटला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अ. प.) स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेईल, असेही इंद्रनील नाईक यांनी सांगितले.

आमदार मिटकरी यांची नाराजी

अकोल्यात महायुतीतील संभाव्य जागावाटपावरून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.. मिटकरी यांनी सन्मानजनक जागा देण्याची मागणी केली आहे.. आम्हाला जर महायुतीत सन्मानजनक म्हणजेच 25 जागा राष्ट्रवादीला सोडल्या तरच आम्ही म्हणजे पक्ष महायुतीत लढेल अन्यथा आम्ही स्वबळावर लढू असा इशाराही आमदार मिटकरी यांनी दिला आहे. तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचही मिटकरी म्हणाले, चर्चांना महत्व नाही. फक्त कोणत्या चिन्हावरून लढायच याचा निर्णय घेतला जाईल पुणे मध्ये अजित पवार जो निर्णय घेतील तो महत्वाचा असेल असेही मिटकरी म्हणाले.. तर महायुतिच्या बैठकीला जरी मला बोलवले नाही तरीही इंद्रनील नाईक यांच्या मी संपर्कात असल्याचा दावाही मिटकरी यांनी केला आहे..

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande