अकोल्यात शिवसेना शिंदे गटाने जाळला बांगलादेशचा ध्वज
अकोला, 27 डिसेंबर, (हिं.स.)। मागील काही दिवसांपासून बांगलादेशातील हिंदू बांधवांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नुकतीच दिपुचंद्र दास या निरपराध हिंदू युवकाची काही जिहादी व धर्मांध मुस्लिमांकडून निर्घृण हत्या करण्यात आली. या
P


अकोला, 27 डिसेंबर, (हिं.स.)। मागील काही दिवसांपासून बांगलादेशातील हिंदू बांधवांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नुकतीच दिपुचंद्र दास या निरपराध हिंदू युवकाची काही जिहादी व धर्मांध मुस्लिमांकडून निर्घृण हत्या करण्यात आली. या अमानुष हत्येमुळे संपूर्ण हिंदू समाजामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज शिवसेना शिंदे गटाकडून अकोल्याततील गांधी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान उपस्थित शिवसेना कार्यकर्त्यांनी बांगलादेशी ध्वज जाळून आपला रोष व्यक्त केला.. तर बांगलादेश सरकार विरोधात घोषणाबाजी केली. भारत व बांगलादेश सरकारने तेथील हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी तत्काळ ठोस पावले उचलावीत, अन्यथा रस्त्यावर उतरून आणखी तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला आहे..निषेध आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande