
बीड, 27 डिसेंबर (हिं.स.)।
बीड नगरपरिषदेच्या भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका सारिका क्षीरसागर यांनी
प्रभागातील स्वच्छता व आदि कामांची आजपासुन स्वतः उभा राहुन सुरुवात करून घेतली.मोठ्या मताधिक्याने या प्रभागातील नागरिकांनी विश्वास टाकला असल्याचे सांगितले
सारिका क्षीरसागर म्हणाल्या,
या विश्वासाची कवचकुंडले सोबत घेऊन कामांच्या माध्यमातून माझ्या प्रभागासाठी आणि त्याच बरोबर बीड शहरासाठी सर्व भाजपाचे नगरसेवक याच पद्धतीने नेहमी लोकांत राहूनच काम करणार आहोत.
बदलत्या परिस्थितीनुरुप ज्या ज्या सूचना शहरातील नागरिक आम्हाला कळवतील त्याचा नक्कीच पाठपुरावा करून त्या पूर्ण होऊ पर्यंत आमचा नगरसेवक आणि तेथील कार्यकर्ता हा कटिबद्ध असणार आहे.
यावेळी सहकारी नगरसेवक सनी माने,नगर परिषदेचे स्वच्छता विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis