बिडकीन औद्योगिक वसाहतीत २१ ऑटो ॲन्सिलरी कंपन्यांनी केली ९,४०० कोटी रुपयांची गुंतवणूक
छत्रपती संभाजीनगर, 27 डिसेंबर (हिं.स.)। टोयोटा पाठोपाठ छत्रपती संभाजी नगर येथील बिडकीन औद्योगिक वसाहतीत २१ ऑटो ॲन्सिलरी कंपन्यांनी ९,४०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, या माध्यमातून थेट १०,१९० जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. राज्याच
अ


छत्रपती संभाजीनगर, 27 डिसेंबर (हिं.स.)।

टोयोटा पाठोपाठ छत्रपती संभाजी नगर येथील बिडकीन औद्योगिक वसाहतीत २१ ऑटो ॲन्सिलरी कंपन्यांनी ९,४०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, या माध्यमातून थेट १०,१९० जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनीही आज माहिती दिली आहे.

मंत्री अतुल सावे म्हणाले की,

बिडकीन औद्योगिक वसाहत छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक परिवर्तनाचे केंद्र बनत आहे. टोयोटा, एथर, जेएसडब्ल्यू यांसारख्या जागतिक दर्जाच्या वाहन निर्मिती कंपन्यांनंतर हायब्रीड व ईव्ही क्षेत्राशी संलग्न २१ ऑटो ॲन्सिलरी कंपन्यांनी एकूण ९,४०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे थेट १०,१९० युवकांना रोजगार उपलब्ध होणार असून अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगधंदे यावेत, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा आणि शहरात खरी औद्योगिक क्रांती घडावी यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि राज्य शासनाच्या दूरदृष्टीपूर्ण धोरणांमुळे बिडकीन डीएमआयसी आज वेगाने देशातील प्रमुख ऑटो व ईव्ही हब म्हणून विकसित होत आहे.

सध्या बिडकीन औद्योगिक वसाहतीत २२ ते २५ उद्योग जागेअभावी वेटिंगवर असून, पुढील टप्प्यात ८,००० एकर अतिरिक्त जमीन उपलब्ध झाल्यानंतर आणखी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे. यामुळे उत्पादन, रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

या औद्योगिक घोडदौडीमुळे शहराबाहेर गेलेले स्थानिक टॅलेंट म्हणजेच रोजगारासाठी पुणे मुंबई अशा शहरांकडे वळणारी युवा पिढी पुन्हा छत्रपती संभाजीनगरकडे परत येईल, लघु उद्योजकांना नवे संधीचे दालन खुले होईल आणि शहराचा सर्वांगीण विकास वेगाने घडेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. असे त्यांनी सांगितले

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande