
लातूर, 27 डिसेंबर (हिं.स.)। शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर येथे महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई, भाषा मंत्रालय महाराष्ट्र शासन, व श्री अनंतपाळ नवयुवक ग्रंथालय शिरूर अनंतपाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य संमेलनात आज श्री अनंतपाळ साहित्य सेवा पुरस्कार.दगडू मथुरा बाबुराव लोमटे यांना प्रदान करण्यात आला.
संमेलनाध्यक्ष डॉ. नागोराव कुंभार, उद्घाटक डॉ . रणधीर शिंदे यांच्या हस्ते व डॉ श्रीधर नांदेडकर, देविदास फुलारी, प्रा. फ. म. शहाजिंदे व इतर सर्वांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis