
छत्रपती संभाजीनगर, 27 डिसेंबर (हिं.स.)।
छ. संभाजीनगरमध्ये एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. प्रभाग क्रमांक १२ मध्ये एमआयएम पक्षाकडून मोहंमद इसरार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काढण्यात आलेल्या आनंद रॅलीमध्ये पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. इसरार यांच्या समर्थकांनी रॅली काढली असता, याच प्रभागातून इच्छुक असलेल्या हाजी इसाक यांच्या समर्थकांनी रॅली अडवली. या वेळी दोन्ही गटांत शाब्दिक वाद आणि हाणामारी झाली.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रभाग क्रमांक १२ मध्ये एमआयएम पक्षाने मोहंमद इसरार यांना उमेदवारी जाहीर केल्याच्या आनंदात काढण्यात आलेल्या रॅलीत पक्षाच्याच दुस-या गटाने हमरीतुमरी केली. या प्रकारामुळे परिसरात काही – काळ तणावाचे वातावरण निर्माण – झाले होते. एमआयएम पक्षाकडून प्रभाग – १२ साठी मोहंमद इसरार यांचे – नाव निश्चित केले. उमेदवारी – मिळाल्याचा आनंद साजरा – करण्यासाठी इसरार यांनी समर्थकांसह किराडपुरा भागात रॅली काढली होती.
मात्र, याच प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले हाजी इसाक यांचे समर्थक या निर्णयामुळे संतप्त झाले होते. रॅली किराडपुरा भागात पोहोचताच हाजी इसाक यांच्या समर्थकांनी रॅली अडवली. या वेळी दोन्ही गटात शाब्दिक चकमक झाली, ज्याचे रूपांतर पुढे किरकोळ हाणामारीत झाले. संतप्त कार्यकर्त्यांनी रॅलीवर हल्ला करत मोहंमद इसरार यांच्या समर्थकांना मारहाण व शिवीगाळ केली. या गोंधळामुळे रॅली अर्ध्यावरच बंद पाडावी लागली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis