
नाशिक, 27 डिसेंबर, (हिं.स.)। नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी आता जवळजवळ चित्र स्पष्ट झाले असून भाजपा स्वतंत्र निवडणूक लढणार आहे तर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली असून दोन्ही काँग्रेसची स्वतंत्र आघाडी होणार आहे त्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थिती नुसार महानगरपालिका निवडणुकीमध्ये किमान सात ते आठ उमेदवारांपेक्षा जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून सोमवारी अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त काढला आहे त्यामुळे आता सोमवारी मोठ्या प्रमाणावरती उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे सर्व घडत असताना नाशिकमध्ये मात्र आता भाजपा स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहे हे स्पष्ट झाले असून भाजपाच्या उमेदवारांची यादी घोषित होण्यापूर्वीच बहुतेक ठिकाणी भाजप उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे पॅनल तयार करून ही प्रचार यंत्रणा काम करत आहे तर भाजपाचा मित्र पक्ष असलेला आणि राज्यात महायुतीमध्ये असलेले शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पक्ष हा नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी म्हणून युती करत असून हे दोन्हीही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढणार आहे या दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ही अंतिम टप्प्यात पोचली असून याबाबतची घोषणा रविवारी सायंकाळपर्यंत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे मात्र मुंबईमध्ये वेगळ्या लढणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने नाशिक मध्ये मात्र शिवसेना मनसे सोबत एकत्र येऊन आघाडी करायचा निर्णय घेतलेला होता राज्यामध्ये महाविकास आघाडीचा हा प्रयोग फक्त नाशिकमध्येच सुरू होता पण त्याला मात्र यश आले नाही.
महाविकास आघाडीमध्ये देखील बिघाडी झालेली आहे . शनिवारी दुपारपर्यंत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अखिल भारतीय काँग्रेस यांच्या बैठका सुरू होत्या. पण या बैठकांमध्ये कोणत्याही प्रकारचा तोडगा निघू शकला नाही त्यामुळे शनिवारी दुपारी या महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने असलेली युती कायम ठेवायचा निर्णय घेत एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांच्याही उमेदवारांना रविवारी किंवा सोमवारी सकाळपर्यंत एबी फॉर्म दिले जाणार असून ते आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
महाविकास आघाडीमध्ये एकमत होऊ न शकल्यामुळे काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रित येऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची बैठक सुरू असून रविवार पर्यंत त्यांची जागावाटप देखील पूर्ण होणार आहे त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. असे दोन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आलेले आहे.
दरम्यान याबरोबरच नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी म्हणून आम आदमी पार्टीच्या वतीने पहिली उमेदवारांची यादी घोषित करण्यात आली आहे दुसरी यादी रविवारी घोषित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे तर त्यांच्या बरोबरीलाच वंचित बहुजन आघाडी, काही प्रभागांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अपक्ष अशा सात ते आठ जण एका प्रभागांमध्ये निवडणूक लढविणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
कैलास मुदलियार शिंदे सेनेमध्ये
एकीकडे पक्ष युती महाविकास आघाडी करण्याच्या बैठका करत असतानाच सामाजिक कार्यकर्ते कैलास मुदलीयार यांनी शनिवारी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे, जिला प्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तीदमे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे. नासिक रोड येथील प्रभाग क्रमांक 20 मधून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV