मनोज जरांगे रुग्णालयात दाखल
छत्रपती संभाजीनगर, 27 डिसेंबर (हिं.स.)। मराठा आरक्षणासाठी लढणा-या मनोज जरांगे यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सततचे दौरे आणि दगदगीमुळे त्यांना शारीरि
मनोज जरांगे रुग्णालयात दाखल


छत्रपती संभाजीनगर, 27 डिसेंबर (हिं.स.)।

मराठा आरक्षणासाठी लढणा-या मनोज जरांगे यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सततचे दौरे आणि दगदगीमुळे त्यांना शारीरिक थकवा जाणवत होता, मात्र आज ताप भरल्याने त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज भासली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मनोज जरांगे यांना गेल्या काही तासांपासून तीव्र ताप येत होता. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेले दौरे, सभा आणि आंदोलनांच्या नियोजनामुळे त्यांच्या शरीरावर मोठा ताण आला होता. प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच सहका-यांनी त्यांना तातडीने गॅलेक्सी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. सध्या डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्यावर उपचार करत असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

जरांगे पाटील रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त वा-यासारखे पसरताच, छत्रपती संभाजीनगरमधील मराठा समाजबांधव आणि त्यांच्या समर्थकांनी गॅलेक्सी रुग्णालयाबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande