प्रजासत्ताक दिन परेड शिबिरासाठी कोल्हापूर एनसीसीच्या विद्यार्थ्यांची निवड
कोल्हापूर, 27 डिसेंबर (हिं.स.)। एनसीसी ग्रुप मुख्यालय, कोल्हापूरच्या अंतर्गंत ११ विद्यार्थ्यांची प्रजासत्ताक दिन परेड (2026) शिबिरासाठी निवड झाली आहे .यामध्ये 5 विद्यार्थी तर 6 विद्यार्थीनींचा समावेश आहे. या तुकडीत राज्यभरातून 127 एनसीसी विद्यार्थी
प्रजासत्ताक दिन परेड शिबिरासाठी निवड झालेले विद्यार्थी


कोल्हापूर, 27 डिसेंबर (हिं.स.)। एनसीसी ग्रुप मुख्यालय, कोल्हापूरच्या अंतर्गंत ११ विद्यार्थ्यांची प्रजासत्ताक दिन परेड (2026) शिबिरासाठी निवड झाली आहे .यामध्ये 5 विद्यार्थी तर 6 विद्यार्थीनींचा समावेश आहे. या तुकडीत राज्यभरातून 127 एनसीसी विद्यार्थी सहभागी झाले आहेत.कोल्हापूर मुख्यालयासाठी हा अत्यंत अभिमान व गौरवास्पद क्षण आहे.

निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे-सीनियर अंडर ऑफिसर हिमेश राठोड,रिद्धी पदमुखे,सर्जंट राधिका क्षत्रिय (डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी),मधुरा बाटे (न्यू कॉलेज कोल्हापूर),सीनि.अंडर ऑफिसर ओंकार पवार (वाय.सी.कॉलेज ऑफ सायन्स, कराड) प्रसाद वांगेकर (गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,कराड),प्रमोद चव्हाण,सुष्मिता राठोड(आर.पी.गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी ज्युनि.अंडर ऑफिसर तनिष्का चव्हाण (सी.एस. कॉलेज सातारा) ज्युनि.अंडर ऑफिसर निशांत चव्हाण(विलिंग्डन कॉलेज सांगली) ज्युनि.अंडर ऑफिसर सृष्टी पाठक(महावीर कॉलेज कोल्हापूर) यांची निवड झाली आहे.या विद्यार्थ्यांनी एनसीसी ग्रुप मुख्यालय कोल्हापूर व पुणे एनसीसी ग्रुप मुख्यालय येथे पार पडलेल्या अत्यंत कठीण स्पर्धात्मक निवड प्रक्रियेत आपली पात्रता यशस्वीपणे सिद्ध केली

प्रजासत्ताक दिन परेड शिबिर २९ डिसेंबर ते २९ जानेवारी २०२६ या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे.या कालावधीत निवड झालेले विद्यार्थी महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचे प्रतिनिधित्व करीत एनसीसीचे विविध उपक्रम व स्पर्धांमध्ये सहभागी होतील तसेच २६ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिन व पंतप्रधानांच्या एनसीसी रॅली परेडमध्ये सहभाग नोंदवतील.या विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल ब्रिगेडियर आर.के.पैठणकर, ग्रुप कमांडर, एनसीसी ग्रुप मुख्यालय कोल्हापूर यांनी निवड झालेल्या कॅडेट्स व त्यांच्या प्रशिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande