जीवे मारण्याच्या धमकीनंतर संकेत भासेंची कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार; कठोर कारवाईची मागणी
रायगड, 27 डिसेंबर (हिं.स.)। गरसेवक संकेत भासे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली असून, या प्रकरणी त्यांनी कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. सदर धमकी महेंद्र घारे यांनी दिल्याचा आरोप असून, या
जीवे मारण्याच्या धमकीनंतर संकेत भासेंची कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार; कठोर कारवाईची मागणी


रायगड, 27 डिसेंबर (हिं.स.)।

गरसेवक संकेत भासे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली असून, या प्रकरणी त्यांनी कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. सदर धमकी महेंद्र घारे यांनी दिल्याचा आरोप असून, या घटनेमुळे खोपोली परिसरात शिवसैनिकांमध्ये तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, काल घडलेल्या घटनेनंतर रात्री सोशल मीडियावर “पुढचा नंबर संकेत भासेचा आहे” अशा आशयाच्या कमेंट्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. या कमेंट्समुळे दहशतीचे वातावरण पसरले असून, ही पूर्वनियोजित कटाची पावले असू शकतात, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सुधाकर घारे व त्यांचे सहकारी मिळून वातावरण चिघळवत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत संबंधितांना आश्वासन दिले की, या घटनेत जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पोलिसांनी तत्काळ हालचाली करत आज दोन ते तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. तसेच सोशल मीडियावरील कमेंट्स, व्हिडिओ, फोटो आणि अकाउंट्सची सखोल सायबर चौकशी सुरू असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

संकेत भासे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे निवेदन देत, महेंद्र घारे यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरील कमेंट्स तसेच यापूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडिओंची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. “आम्हीही शिवसैनिक आहोत, मात्र अशा प्रकारच्या धमक्या व दहशत आम्ही सहन करणार नाही,” अशी ठामभूमिका त्यांनी मांडली आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात दोषी आढळणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करून त्यांना जेलबंद करावे, अशी मागणी होत असून, पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande