सत्य लवकर जनतेसमोर यावे, तपास व्यापक करा – सुनील तटकरे
रायगड, 27 डिसेंबर (हिं.स.)। खोपोली येथील हत्येची घटना अत्यंत निंदनीय असून या प्रकरणाचा तपास कोणताही राजकीय हस्तक्षेप न होता सखोल व व्यापक पद्धतीने व्हावा, अशी प्रतिक्रिया खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली.
सत्य लवकर जनतेसमोर यावे, तपास व्यापक करा – सुनील तटकरे


रायगड, 27 डिसेंबर (हिं.स.)। खोपोली येथील हत्येची घटना अत्यंत निंदनीय असून या प्रकरणाचा तपास कोणताही राजकीय हस्तक्षेप न होता सखोल व व्यापक पद्धतीने व्हावा, अशी प्रतिक्रिया खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. तपास सुरू असताना कोणत्याही प्रकारचे मतप्रदर्शन करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तटकरे म्हणाले की, या प्रकरणात सर्व कायदा यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत असून आरोपींना लवकरात लवकर अटक करून न्यायालयासमोर उभे करणे आवश्यक आहे. घटनेपूर्वी दोन-तीन दिवस काय घडले, कोण कोणाच्या संपर्कात होते, फोन कॉल्स व हालचाली काय होत्या, याचा तपास पोलीस विभाग नक्कीच करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुधाकर घारे यांच्याबाबत तटकरे म्हणाले की, ते त्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष असले तरी या प्रकरणाशी त्यांचा कोणताही थेट संबंध नसेल, असा त्यांचा विश्वास आहे. मात्र, त्यांच्या नावावर गुन्हा दाखल झाल्यामुळे सर्व बाबी तपासातूनच स्पष्ट होतील. तपास पूर्ण होईपर्यंत कोणतेही राजकीय भाष्य करणे उचित ठरणार नाही, असेही त्यांनी सांगितले.या हत्येचा तपास अधिक व्यापक व्हावा, गरज भासल्यास स्वतंत्र यंत्रणा किंवा विशेष तपास पथक स्थापन करावे, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केली. घटनेच्या आधी व नंतर झालेले फोन कॉल्स, संपर्क, पार्श्वभूमीतील वादविवाद यांची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.शेवटी तटकरे म्हणाले की, ही घटना अत्यंत दुर्दैवी असून दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. लवकरात लवकर सत्य जनतेसमोर यावे आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, हीच अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande