अमरावती : मतदान कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण यशस्वी
अमरावती, 29 डिसेंबर (हिं.स.)अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ही पूर्णपणे पारदर्शक, निर्भय, मुक्त व शांततापूर्ण वातावरणात पार पडावी, यासाठी अमरावती महानगरपालिका व निवडणूक प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. या तयारीचा अत्यंत
मतदान कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण यशस्वी


अमरावती, 29 डिसेंबर (हिं.स.)अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ही पूर्णपणे पारदर्शक, निर्भय, मुक्त व शांततापूर्ण वातावरणात पार पडावी, यासाठी अमरावती महानगरपालिका व निवडणूक प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. या तयारीचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून मतदान प्रक्रियेत थेट सहभागी असणाऱ्या मतदान केंद्राध्यक्ष तसेच मतदान केंद्राध्यक्ष 1, 2 व 3 या पदांवर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष आणि सखोल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हा प्रशिक्षण कार्यक्रम रविवार, दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत शहरातील सांस्कृतिक भवन तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) येथे एकाच वेळी आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणात विविध शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मतदान प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर सविस्तर मार्गदर्शनया प्रशिक्षणात मतदान प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा अत्यंत सविस्तरपणे समजावून सांगण्यात आला. मतदान केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, मतदारांची ओळख पटविण्याची अचूक पद्धत, मतदार यादी हाताळणी, मतदान प्रक्रियेदरम्यान घ्यावयाची दक्षता, आदर्श आचारसंहितेचे पालन, संवेदनशील परिस्थितीतील कार्यपद्धती, आपत्कालीन प्रसंगी करावयाची कार्यवाही तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कायदेशीर बाबी यावर तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) येथे ईव्हीएम (EVM) व व्हीव्हीपॅट (VVPAT) यंत्रणांचे प्रत्यक्ष हाताळणीसह प्रात्यक्षिक स्वरूपातील प्रशिक्षण देण्यात आले. मशीन सेटअप, मतदानाची प्रक्रिया, त्रुटी आल्यास करावयाची कार्यवाही, सीलिंग व सुरक्षिततेच्या उपाययोजना याबाबत सखोल माहिती देण्यात आली. यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यात आला. यावेळी सहा.निवडणूक निर्णय अधिकारी विजय लोखंडे, अक्षय मांडवे यांनी प्रशिक्षण दिले.अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ही केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया नसून लोकशाही मूल्यांची खरी कसोटी आहे. प्रत्येक मतदाराचा मताधिकार सुरक्षित, निर्भय आणि पारदर्शक पद्धतीने बजावला जावा, हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande