भाईजींचे सेवामय जीवन प्रेरणादायी : स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज
परभणी, 29 डिसेंबर (हिं.स.)। जगन्नाथ पुरी येथील श्रीमद् भागवत महापुराण कथेच्या मंडपात ''बुलडाणा अर्बन''चे संस्थापक राधेश्याम देवकिशन चांडक उर्फ भाईजी यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ''अमृत प्रसाद'' सन्मान सोहळा पार झाला. यावेळी स्वामी गोविं
बुलडाणा अर्बन'चे संस्थापक राधेश्याम देवकिशन चांडक उर्फ भाईजी यांच्या वयाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जगन्नाथ पुरी धाम येथील श्रीमद् भागवत महापुराण कथाप्रसंगी  स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या हस्ते अमृत प्रसाद मानपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती.    ---------------


परभणी, 29 डिसेंबर (हिं.स.)।

जगन्नाथ पुरी येथील श्रीमद् भागवत महापुराण कथेच्या मंडपात 'बुलडाणा अर्बन'चे संस्थापक राधेश्याम देवकिशन चांडक उर्फ भाईजी यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'अमृत प्रसाद' सन्मान सोहळा पार झाला. यावेळी स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी आशीर्वचन देताना, शालेय जीवनात अर्थशास्त्र व इंग्रजी विषयात अपयशी ठरलेल्या भाईजींनी आज अर्थ आणि सहकाराच्या माध्यमातून १८ लाख सभासदांचे जीवन प्रकाशमान केले आहे. अनेक इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण संस्था उभ्या केल्या. गेल्या २० वर्षांपासून त्यांनी रागावर मिळवलेले नियंत्रण आणि त्यांचे सेवामय जीवन नवीन पिढीसाठी प्रेरणादायी, आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार काढले.

या वेळी आयोजक नंदकिशोर झंवर (रिसोड), डॉ.विनोद मंत्री (परभणी), नंदकिशोर बाहेती (सेलू), कीर्ती व मनीष कासट, कोमल व डॉ.सुकेश झंवर, रमेशचंद्र चांडक, शिवनारायण बाहेती, रामवल्लभ बाहेती, कल्पना मंत्री, सुनीता झंवर, कांचन बाहेती, रमा बाहेती, महेश, चेतन, श्याम, संजना, रितू, श्रीषा बाहेती आणि चांडक, झंवर व मंत्री परिवारातील सदस्य उपस्थित होते.

स्वामीजींच्या हस्ते मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, कंठमणी हार व पगडी देऊन भाईजींना सन्मानित करण्यात आले. स्वामीजी म्हणाले की, भाईजींचे जीवन व्यवस्थापन शास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी वस्तुपाठ असून त्यांच्या सामान्य व्यक्तिमत्वात असामान्य महापुरुष दडलेला आहे.

या प्रसंगी बुलडाणा अर्बन परिवार आणि सहकार विद्यालयाच्या वतीने भाईजींच्या जीवनावरील 'समर्पण' ग्रंथाचे प्रकाशन झाले. 'अमृत प्रसाद' ध्वनी चित्रफित प्रदर्शित करण्यात आली. चित्रफितची संकल्पना प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, संकलन प्रा.प्रकाश कुरूंदकर व देविदास ढेकळे यांचे असून निवेदन कीर्ती राऊत व डॉ.सुरेश हिवाळे यांनी केले. झंवर परिवारातर्फे धान्य तुला करण्यात आली. राधेश्याम चांडक परिवारातर्फे ४८ वेद विद्यालय, धर्मश्री प्रतिष्ठान आणि वेदश्री तपोवन या संस्थांना एकूण २५ लाख रुपयांची देणगी देण्यात आली.

सत्काराला उत्तर देताना भाईजी म्हणाले की, केवळ स्वतःसाठी न जगता समाजासाठी दिलेले योगदान जीवनगाथा मोठी करते. बुलडाणा अर्बन ही २६ हजार कोटींची संस्था आणि २२ शाळा हे केवळ विश्वासावर उभे आहेत. वेळेचे अचूक नियोजन, दिलेला शब्द पाळणे आणि क्रोधावर नियंत्रण ही यशाची तीन सूत्रे त्यांनी सांगितली. रागामुळे नाती उद्ध्वस्त होतात, म्हणून सुखी संसारासाठी क्रोधाचा त्याग करण्याचे आवाहन त्यांनी केले.

..... ..... .....

'

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande