आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करावे- आ. राजेश विटेकर
परभणी, 29 डिसेंबर (हिं.स.)। आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करून पक्ष बळकटीसाठी काम करावे, आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक
विटा येथे कार्यकर्ता मेळावा


परभणी, 29 डिसेंबर (हिं.स.)। आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करून पक्ष बळकटीसाठी काम करावे, आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्कमपणे विजय मिळेल, असा विश्‍वास आमदार राजेश विटेकर यांनी कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्या प्रसंगी व्यक्त केला.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विटा येथील चिंतामणी मळ्यात आमदार विटेकर यांच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोनपेठ नगर परिषदेसाठी निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांचा व विजय झालेल्या नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दशरथ सूर्यवंशी आदींनी मार्गदर्शन केले. सोनपेठ तालुक्यातील सर्व पदाधिकार्‍यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचा निर्धार व्यक्त केला. स्थानिक प्रश्‍नांवर तोडगा काढण्यासाठी पक्षाने केलेली कामे आणि आगामी काळात होणार्‍या योजनांची माहिती देत कार्यकर्त्यांना जनतेशी जोडून घेण्याचे आवाहन आमदार राजेश विटेकर यांनी केले.

याप्रसंगी जि.प. माजी सभापती विठ्ठलराव सूर्यवंशी, रंगनाथराव रोडे, माजी उपसभापती मदनराव भोसले, श्रीकांत विटेकर, नगरसेवक बळीराम काटे, यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande