
छत्रपती संभाजीनगर, 29 डिसेंबर (हिं.स.)। माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी
आज छत्रपती संभाजीनगर येथील गॅलॅक्सी हॉस्पिटलमध्ये संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या तब्येतीबाबत आपुलकीने चौकशी केली.
गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत
लवकरात लवकर पूर्णपणे बरे होऊन ते पुन्हा जोमाने सामाजिक कार्यात सक्रिय होतील, अशी मनःपूर्वक सदिच्छा यावेळी आमदार प्रकाश सोळंके यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis