
परभणी, 29 डिसेंबर (हिं.स.)।
महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सांस्कृतिक समितीवर सह अध्यक्षपदी परभणीतील पॅथॉलॉजीस्ट, लेखिका, कवयित्री व गीतकार डॉ. पल्लवी जाधव दोडके यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे सलग चौथ्या वर्षी ही निवड झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासूनचे समितीवरचे कार्य व मराठी साहित्य क्षेत्रातील वाटचाल पाहता असोसिएशनने पुन्हा त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी, सचिव डॉ.विक्रांत देसाई, कोषाध्यक्ष डॉ.अमोल गीते, माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे, आय. एम.ए. एम. एस. तसेच सांस्कृतिक समितीचे चेअरमन डॉ. राजेश इंगोले व परभणी जिल्ह्यातील डॉक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis