
परभणी, 29 डिसेंबर (हिं.स.)।
परभणी जिल्ह्यातील ज्या ज्या महाविद्यालयात 400 व 200 मी धावनमार्ग ( ट्रॅक ) कार्यान्वित आहेत त्या महाविद्यालयातील ट्रॅक वर होणाऱ्या मैदानी खेळाच्या स्पर्धेचे आयोजन सुव्यवस्थित व देखणे होण्यासाठी उपयुक्त साहित्य देण्याचा उपक्रम परभणी जिल्हा अथलॅटिक्स असोसिएशन गेल्यावर्षी पासुन राबवित आहे.
यावर्षी मानवत येथील के.के.एम. महाविद्यालयातील 400 मी.च्या ट्रॅक वर सातत्याने विविधस्तरावरांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते.तसेच परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयातील 200 मी.ट्रॅकवर ही स्पर्धा आयोजित केली जाते.
या दोन्ही महाविद्यालयाच्या क्रीडा विभागास जिल्हा अथलॅटिक्स असोसिएशन तर्फे झेंड्याचे पोल व टेबल कायमस्वरुपी भेट देण्यात आले आहेत.या उपक्रमावर परभणी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन
ने 35 हजार रुपये खर्च केले आहेत.
के.के.एम.काॅलेजचे प्राचार्य डाॅ.भास्कर मुंढे ,क्रीडा विभाग प्रमुख डाॅ.पवन पाटील ,श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.बाळासाहेब जाधव ,उपप्राचार्य डाॅ.रोहिदास नितोंडे,कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य नारायण राऊत, क्रीडा विभाग प्रमुख डाॅ.संतोष कोकिळ , प्रा.राजेन्द्र रेंगे यांच्याकडे सदरील साहित्य सुपुर्द केले. यावेळी परभणी जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन चे उपाध्यक्ष रणजित काकडे,सहसचिव कैलास टेहरे ,कार्यालयीन प्रमुख यमनाजी भाळशंकर,प्रशिक्षक अजय राठोड यांची उपस्थित होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis