
छत्रपती संभाजीनगर, 29 डिसेंबर (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर येथील वंचित बहुजन आघाडीचे पूर्व शहराध्यक्ष अफसर पठाण, विशाल इंगळे, अब्बास मैदू शेख यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले की छत्रपती संभाजी नगर महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात प्रवेश केला जात आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 मधून ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणुक लढवणार आहेत. याप्रसंगी पक्षात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख, नागेश भालेराव आदींची उपस्थिती होती...
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis