
अमरावती, 29 डिसेंबर (हिं.स.)।
अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवारांची दुसरी यादी जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांनी जाहीर केली. या यादीनुसार आतापर्यंत एकूण २० उमेदवारांची घोषणा करण्यात असून, महिला, अल्पसंख्याक, मागासवर्गीय व नव्या चेहऱ्यांना संधी देत पक्षाने सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.माजी उपमहापौर रामकृष्ण सोळंके यांच्या पत्नी कोकिळा रामकृष्ण सोळंके यांना तिकीट देण्यात आले आहे. तसेच बडनेरा नवी वस्ती(प्रभाग २२) येथे दोन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान, जमील कॉलनी विभागात फरजाना परवीन यांना 'मशाल' चिन्ह देण्यात सेना आले असून ठाकरे गटाने अल्पसंख्याक मतदारांवर लक्ष केंद्रीत केल्याचे त्यातून स्पष्ट होते. पक्षाच्या सूत्रांनुसार, लवकरच उर्वरित जागांसाठी पुढील यादी जाहीर होण्याची शक्यता असून शहरातील राजकीय हालचालींना आणखी वेग येणार आहे.प्रभाग प्रदीप विष्णुपंत बाजड क्र. ३, प्रवीण वसंतराव हरमकर -प्रभाग क्र. १४, वैशाली आशीष विधाते प्रभाग क्र. ३, शारदा संजय गोंडाने प्रभाग क्र. १०, विजय किसनलाल मंडले प्रभाग क्र. ११,जयश्री देवराव कुन्हेकर प्रभाग क्र. १२, विशाखा प्रवीण हरमकर - प्रभाग क्र. १४, पूनम पियूष धोटे क्र. १३, सुषमा रविकांत काकडे प्रभाग क्र. १७, संजय नामदेवराव शेटे प्रभाग प्रभाग क्र. २०, संजय रामकृष्ण गव्हाळे प्रभाग क्र. २०, संगिता सुखलाल कैथवास प्रभाग क्र. २१, अर्चना बंडू धामणे प्रभाग क्र. २२, पंजाबराव तायवाडे प्रभाग क्र. ६, बाळकृष्ण आढाऊ प्रभाग क्र. २, प्रविना सीताराम आठवले प्रभाग क्र. भिलावेकर ३ (नवसारी), अजय जयसिंग प्रभाग क्र. ८ (जोग स्टेडियम, चपराशिपुरा), कोकिळा रामकृष्ण सोळंके प्रभाग क्र. २० (सूतगिरणी), फरजान परवीन सय्यद शकील प्रभाग क्र. ४ (जमील कॉलनी, लालखडी), चैतन्य विकास काळे -प्रभाग क्र. २२ (नवी वस्ती, बडनेरा) यांचा या दुसऱ्या यादीत समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी