अकोल्यात सततच्या पावसाने सोयाबीनचे प्रचंड नुकसान, 6.81 लाख पोती खरेदीतून बाद
अकोला, 3 डिसेंबर (हिं.स.)। अवकाळी आणि सलग सुरू असलेल्या पावसामुळे राज्यातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चार ते पाच दिवस सोयाबीन पाण्याखाली राहिल्याने दाण्यातील आर्द्रता प्रचंड वाढली असून दाणे काळे पडू लागले आहेत. परिणामी या सो
P


अकोला, 3 डिसेंबर (हिं.स.)।

अवकाळी आणि सलग सुरू असलेल्या पावसामुळे राज्यातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चार ते पाच दिवस सोयाबीन पाण्याखाली राहिल्याने दाण्यातील आर्द्रता प्रचंड वाढली असून दाणे काळे पडू लागले आहेत. परिणामी या सोयाबीनला मानक दर्जा न मिळाल्याने खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात नकार दिला जात आहे.पणन महासंघाच्या माहितीनुसार, यंदा खरेदीसाठी 3 लाख 56 हजार 65 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. मात्र त्यापैकी केवळ 13,983 शेतकऱ्यांकडून 3 लाख 14 हजार 704 क्विंटल सोयाबीनचीच खरेदी करण्यात आली. उर्वरित मोठ्या प्रमाणातील माल दर्जेदार नसल्याचे कारण देत नाकारण्यात आला आहे.सुमारे 6.81 लाख पोती, ज्यांची अंदाजे किंमत 180 कोटी रुपये, अशी प्रचंड मालमत्ता खरेदी प्रक्रियेतून बाद झाल्याची माहिती पणन विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. खरेदी नाकारल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने सोयाबीन खाजगी व्यापाऱ्यांकडे कवडीमोल दराने विकावे लागत असून आर्थिक फटका बसत आहे.

शेतकऱ्यांच्या हातात नुकसान भरपाई, तात्काळ पंचनामे आणि ओलसर सोयाबीनसाठी स्वतंत्र निकष ठरवण्याची मागणी जोर धरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande