नांदेड - बिबट्याला पकडण्यासाठी ट्रॅप कॅमेरे व पिंजरा; नायगाव परिसरात दहशत कायम
नांदेड, 3 डिसेंबर (हिं.स.)। कुष्णूर औद्योगिक वसाहतीत दोन नागरिकांवर हल्ला करणाऱ्या बिबट्यामुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. हल्ल्यानंतर वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरा लावून रात्रभर पाळत ठेवली. मात्र सर्व प्रयत्
नांदेड - बिबट्याला पकडण्यासाठी ट्रॅप कॅमेरे व पिंजरा; नायगाव परिसरात दहशत कायम


नांदेड, 3 डिसेंबर (हिं.स.)।

कुष्णूर औद्योगिक वसाहतीत दोन नागरिकांवर हल्ला करणाऱ्या बिबट्यामुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. हल्ल्यानंतर वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरा लावून रात्रभर पाळत ठेवली. मात्र सर्व प्रयत्नांनंतरही बिबट्या पसार होण्यात यशस्वी ठरला.

बिबट्या सावरखेड-बरबडा परिसरात गेल्याची शक्यता असून ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वन विभागाची टीम सतत शोधमोहीम राबवित असून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande