नांदेड - अंजलीताई आंबेडकर यांची सक्षम ताटे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट
नांदेड, 3 डिसेंबर (हिं.स.)। आज वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी नांदेड येथे सक्षम ताटे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. सक्षम ताटे हत्या प्रकरण अत्यंत क्रूर आहे, वंचित बहुजन आघाडी ताटे कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत ठामप
ताटे कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत ठामपणे कुटुंबियांच्या पाठीशी


नांदेड, 3 डिसेंबर (हिं.स.)। आज वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी नांदेड येथे सक्षम ताटे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. सक्षम ताटे हत्या प्रकरण अत्यंत क्रूर आहे, वंचित बहुजन आघाडी ताटे कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत ठामपणे कुटुंबियांच्या पाठीशी उभी आहे, असे अंजलीताई आंबेडकर यांनी सांत्वन करत विश्वास दिला.

नांदेड शहरात सक्षम ताटे यांच्या हत्येनंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे. प्रेम प्रकरणातून सक्षम ताटे याची भर शहरात हत्या करण्यात आली होती. वंचित बहुजन आघाडीने या घटनेला पाठिंबा दिला आहे.

सक्षम ताटे याच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रेयसीने त्याच्या मृतदेहाशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी या तरुणीच्या धाडसाला दाद दिली होती. या प्रकरणात पीडित कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

यावेळी राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद, जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, प्रशांत इंगोले उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने नागरिकांची आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande